जालना : जालना तालुक्यातील रामनगर येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. रात्री बॅनर लावण्याच्या वादातून ही हाणामारी झाली असल्याचे समोर येते आहे. या हाणामारीत एका गटाने दुसऱ्या गटातील तरुणावर गोळीबार केला. पोटावर गोळीबार झाल्याने हा तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे. रामनगरमधील शिवसेनेचे कार्यकर्ते शिवाजी शेजुळ आणि रमेश जोशी यांच्यात रात्री रोडवर बॅनर लावण्याचा कारणावरून वाद झाल्याची घटना घडली होती. या वादाचं रूपांतर सकाळी मोठ्या हाणामारीत झालं आणि दोन्ही गट आमने सामने आल्याने दोन गटात हाणामारी झाली.

धक्कादायक! अन्न सुरक्षा योजनेतून गरिबांना मिळतंय बुरशी आणि किडे पडलेलं धान्य
या वादात एका गटाने दुसऱ्या गटाच्या तरुणावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला असून विजय ढेगळे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्या पोटात गोळी लागल्यानं हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले असून परीसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या तरूणाला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आलं असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

आता तर कहरच झाला! दारु पिण्यासाठी ग्लास दिला नाही म्हणून असं काही केलं वाचून हादराल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here