औरंगाबाद : कधी कोण काय करेल याचा काही अंदाजच बांधला जाऊ शकत नाही. आता असचकाही प्रकार औरंगाबाद शहरातील मिसारवाडी भागात समोर आला आहे. दारू पिण्यासाठी पाणी आणि ग्लास दिला नाही म्हणून,चक्क चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तर याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र सहदेव नेतनराव ( वय 40 वर्षे, रा.मिसारवाडी गल्ली नं.08 औरंगाबाद ) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार ते घरी नसताना त्यांच्याच गल्लीत राहणारा दादाराव बबन अडसुळे याने घरी येऊन राजेंद्र यांच्या मुलीला दारू पिण्यासाठी ग्लास आणि पाणी मागितले. मात्र मुलीने त्याला पाणी व ग्लास देण्यास नकार दिला असता त्याने मुलीला शिवीगाळ केली. दरम्यान राजेंद्र नेतनराव घरी आली असता त्यांना घडलेला प्रकार कळला. यावेळी राजेंद्र यांनी दादाराव याला आमच्या घराच्या गल्लीतुन निघुन जाण्यास सांगितले असता त्याने राजेंद्र यांना मारहाण केली व त्याच्याजवळ असलेल्या धारधार चाकुने डाव्या हाताच्या दंडावर वार केला.

धक्कादायक! अन्न सुरक्षा योजनेतून गरिबांना मिळतंय बुरशी आणि किडे पडलेलं धान्य
दादाराव अडसुळे याने मारलेल्या चाकू लागल्याने राजेंद्र यांच्या दंडातुन रक्त येत असल्याने दादाराव हा तेथुन पळुन गेला. त्यांनतर राजेंद्र यांनी सिडको पोलिसात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. मात्र त्यांना जखम झाल्याने आणि हातातून रक्त येत असल्याने पोलिसांनी त्यांना औषध उपचार करण्यासाठी मेडीकल मेमो देऊन शासकीय घाटी रुग्णालयात पाठवले. उपचारानंतर राजेंद्र नेतनराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून दादाराव अडसुळे याच्याविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिवेशन काळात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकणार; ‘या’ आहेत मागण्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here