निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील २५८ नागरिकांची यादी शुक्रवारी प्राप्त झाली होती. त्यामध्ये ८६ जणांची भर पडली आहे. आता ३४४ जण झाले आहेत. शुक्रवारी १६३ नागरिकांना ‘क्वारंटाइन’ करण्यात होते. आता आणखी ५० जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या नागरिकांपैकी चार नागरिक हे करोनाबाधित असल्याचे शुक्रवारी आढळून आले होते. याबाबत डॉ. म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रसार माध्यमांना माहिती दिली.
ते म्हणाले, ‘निजामुद्दीन येथे झालेल्या मेळाव्याला गेलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे. आतापर्यंत ३४४ नागरिकांची यादी मिळाली आहे. शनिवारी ५० जणांना क्वारंटाइन करण्यात आले. या यादीतील ३१ जण हे विभागाबाहेरील असून, ४८ जण हे राज्याबाहेरील आहेत. २२ जणांचा अद्याप शोध घेण्यात आलेला नाही. या यादीतील काही नागरिक हे प्रत्यक्ष मेळाव्यात सहभागी झाले होते, तर काहीजण हे त्या परिसरात आढळून आले आहेत.’
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times