भंडारा : भंडारा निलज राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेले कार्य हे निकृष्ठ दर्जाचे असल्याची तक्रार असून कारवाई होत नसल्याने पहिला गावातील लोकांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्याला समोर येत काळे झेंडे दाखवित निषेध नोंदविला. पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे.

भंडारा निलज महामार्गाचे मागील पाच वर्षापासून कासव गतीने सुरू आहे. सदर महामार्गावर दवडीपार ते बोरगाव व ईटगाव ते नेरला जंगल भागातील रस्त्याचे सिमेंटीकर वन कायद्यामुळे थांबून आहे. कंपनी आणि संबंधित विभाग जंगल भागातील डागडुजीचे काम करत नसल्यामुळे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडुन दररोज अपघात घडुन अनेक लोक अपघाताला बळी पडले आहेत. कंपनीने रस्ता ठिक ठिकाणी खोदून ठेवला परंतु मागील दोन वर्षापासून बांधकाम केले नाही. ज्या भागात सिमेंटीकरणाचे काम झाले त्या ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.

आता तर कहरच झाला! दारु पिण्यासाठी ग्लास दिला नाही म्हणून असं काही केलं वाचून हादराल
एकंदरीत कंपनीने केलेलं काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्या संबंधात अनेकदा निवेदन देण्यात आले तरीही साधी चौकशी सूध्दा करण्यात आली नाही. केंद्रीय परिवहन मंत्री दिनांक ३ मार्च रोजी आंभोरा वरुन पहेला मार्गाने कारधा येथे राष्ट्रीय मार्गाच्या बायपास रस्त्याचे भुमिपूज कार्यक्रमाला भंडारा येथे आले. त्यामुळे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना रस्त्याची दुर्दशा लक्षात आणून देण्यासाठी पहेला ग्रामस्थांनी येथे काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. अचानक रस्त्यावर काळे झेंडे घेऊन आलेल्या लोकांना पाहून पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यान रोखण्याचा प्रयत्न केला अणि अटक केली.

निवडणुकांआधी औरंगाबादमध्ये राजकारण तापलं, शिवसेनेच्या गडामध्ये भाजपचं शक्तिप्रदर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here