कोल्हापूर : जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करुन वृद्ध शेतकऱ्याचा खून करण्यात आला आहे. ही घटना हातकणंगले तालुक्यातील साजणी येथे घडली. मुनाफ महमंदहुसेन सत्तारमेकर (वय ६३, रा. तिरंगा कॉलनी, कबनूर) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. या गुन्ह्यातील हल्लेखोर नितीन भाऊसो कोणिरे (वय ३०, रा. साजणी) हा स्वत:हून पोलिसांत हजर झाला आहे. (Kolhapur Murder Latest News)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित नितीन कोणिरे याची शेतजमीन काही वर्षांपूर्वी मुनाफ सत्तारमेकर यांनी विकत घेतली आहे. जमीन विक्रीवरुन दोघांमध्ये वाद होता. हा वाद कोर्टात सुरू आहे. बुधवारी जमिनीच्या वादावरुन साजणी येथील सत्तारमेकर यांच्या शेतात नितीन कोणिरे गेला. दोघांमध्ये शेतीवरून वाद झाला. वादावादी वाढत जाऊन नितीन कोणिरे याने मुनाफ सत्तारमेकर यांच्या मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यावेळी सत्तारमेकर यांच्या मानेवरच घाव बसल्याने ते जागीच ठार झाले.

बॅनर लावण्यावरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, हाणामारीत एकाकडून गोळीबार

या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस निरीक्षक के.एन. पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. हल्लेखोर कोणिरे स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शकुंतला वागलगावे करत आहेत.

दरम्यान, शेतीच्या वादातून झालेल्या या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here