मुंबई: महाराष्ट्रात करोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या ६३५ वर गेली आहे. आतापर्यंत ३२ जणांचा करोनाने मृत्यू झाला असून ५२ जण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

महाराष्ट्रात मुंबईत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या तब्बल ३३० इतकी झाली आहे. एकट्या मुंबईतच करोनाने २२ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबई हा या साथीचा केंद्रबिंदू ठरला आहे. मुंबईत आज करोनाचे नवीन ५२ रुग्ण आढळले आहेत तर आज चार जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. आज ज्या चार जणांचा मृत्यू झाला आहे त्यात एक व्यक्ती वृद्ध होती तर अन्य तिघांना विविध शारीरिक व्याधींनी ग्रासलेले होते, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here