सामाजिक विषय असलेल्या ‘खिसा’नं देशाबाहेरही झेंडा रोवला. आता ‘बिचौलीया’ लघुपटदेखील त्याचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज आहे. हा लघुपट सआदत हसन मंटो यांच्या कथेवर आधारित आहे. मंटोंचं लिखाण निर्भीड होतं. त्यांचं लिखाण खोलवर असायचं. त्यामुळे या कथेचं चित्रीकरण करणं म्हणजे आव्हानच होतं, असं राज यांनी सांगितलं.
‘मंटोचं लिखाण धडाडीचं आहे. त्यामुळे कथेच्या तर मी प्रेमात पडलोच पण आव्हानही तितकंच होतं. पण उत्तम टीम लाभल्यामुळे ते शक्य झालं. ‘बिचौलीया’ आता सर्व चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहे. एक वेगळा विषय, उत्तम कथा आणि अनुभवी कलाकार मिळून ‘बिचौलीया’ हा लघुपट तयार झाला आहे’, असं राज म्हणाले. या लघुपटात ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील अंकुर वाढवे मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर इंदिरा तिवारीदेखील मुख्य भूमिका निभावणार आहे. समीर तभाने यांनी लघुपटाची पटकथा लिहिली आहे.