नाशिक : शहरातील मानवता कॅन्सर रुग्णालयातील पाचव्या मजल्यावरून लिफ्टच्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Lift Accident Case)
घटनेची माहिती मिळताच मृत तरुणाच्या नातेवाईकांनी या घटनेला रुग्णालय प्रशासन जबाबदार असून जोपर्यंत रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र पोलीस प्रशासनाकडून या घटनेबाबत कारवाईची आणि रुग्णालय प्रशासनाकडून आर्थिक मदतीची तसंच तरुणाच्या पत्नीला नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आल्याने तणाव निवळला.
दरम्यान, याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मुंबई नाका पोलीस अधिक तपास करत आहे.