भिवसरिया इंडस्ट्रीज नवल रामगोपालजी अग्रवाल (वय ५५, शांतीनगर) यांच्या मालकीची आहे. अग्रवाल यांनी मोठ्या प्रमाणात मास्कचा अवैधपणे साठा करुन ठेवल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने यांना मिळाली. राजमाने यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार यांना छापा टाकण्याचे निर्देश दिले. नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनीट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, सहाय्यक निरीक्षक किरण चौगले, सहाय्यक उपनिरीक्षक नितीन आकोते, आशिष क्षीरसागर, सचिन तुमसरे, अन्न व नागरिक पुरवठा विभागाचे अधिकारी रोहिनी पाठराबे, अमितकुमार उपलप, नीरज लोहकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी भिवसरिया इंडस्ट्रीजमध्ये छापा टाकला. पोलिसांनी तेथून १४ हजार २२५ मास्क जप्त केले. अग्रवाल यांच्याविरुद्ध लकडगंज पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८ तसेच राष्ट्रीय आपत्ती कायदा, साथ रोग अधिनियमसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times