युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) मुंबई विमानतळावर उपस्थित होते. त्यावेळी नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. | Narayan Rane

 

Ajit Pawar Fadnavis

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • विद्यार्थी विमानातून उतरण्यापूर्वी नारायण राणे यांनी विमानात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला
  • आपण ज्या गोष्टीत उघडे पडणार आहोत, तिथे उगाच तोंड कशाला उचकटायचं
मुंबई: युक्रेनहून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबई विमानतळावर गेलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये नारायण राणे (Narayan Rane) यांनी रोमानिया आणि त्याची राजधानी बुखारेस्ट यांचा उच्चार करताना गल्लत केल्याची दिसून आले. नारायण राणे यांनी ‘वुमानिया’ देशाची राजधानी ‘बुखारिया’ असे म्हटले. यावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकारपरिषदेत नारायण राणे यांची फिरकी घेतली होती. रशिया-युक्रेन युद्धाबाबत बोलताना सगळी माहिती घेऊनच बोलले पाहिजे. नक्की कुठल्या देशाची कोणती राजधानी आहे, हे आपल्याला माहिती हवं. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार असू नये. आम्ही काही सर्वगुणसंपन्न नाही. पण आपण ज्या गोष्टीत उघडे पडणार आहोत, तिथे उगाच तोंड कशाला उचकटायचं, अशी टिप्पणी करत अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता.
दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात वऱ्हाडी म्हणून गेलेलं चालतं का?; राष्ट्रवादीचा फडणवीसांना सवाल
यानंतर नारायण राणे यांच्या बचावासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुढे सरसावले होते. विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले होते. या सभागृहात मंत्री काय काय उल्लेख करतात. तेव्हा प्रत्येकाने एकदा स्वत:कडे बघितले पाहिजे. उगीच विनाकारण इतरांवर टीका करू नये. तुमच्या सगळ्यांचे व्हीडिओ बाहेर काढले तर कोण काय-काय बोलले, हे समोर येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे मंगळवारी युक्रेनहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले होते. विद्यार्थी विमानातून उतरण्यापूर्वी नारायण राणे यांनी विमानात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा ही मोहीम सुरू केली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : ajit pawar takes a dig over bjp narayan rane mispronounce romania devendra fadnavis hits back
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here