मुंबई: राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. विरोधकांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी घेत सभागृह डोक्यावर घेतले. तर महाविकासआघाडीने राज्यपालांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेल्या अवमानाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. दोन्ही बाजूंकडून परस्परांवर टीकास्त्र सोडण्यात आले. याच गोंधळात गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमनेसमाने येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे भाजपकडून आज पुन्हा एकदा सभागृहात या मुद्द्यावरून वातावरण तापवले जाऊ शकते. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा ओबीसी आरक्षणाचा अहवाल फेटाळल्याने विरोधकांच्या हाती आणखी एक मुद्दा मिळाला आहे. त्यामुळे भाजप या मुद्द्यावरून राज्य सरकारला धारेवर धरू शकते. त्यामुळे आता ठाकरे सरकार या दोन मुद्द्यांवर शुक्रवारी सभागृहात स्वत:चा बचाव कशाप्रकारे करणार, हे पाहावे लागेल. (Maharashtra Budget Session 2022 Live Updates)
‘वुमानिया-बुखारिया’ उल्लेखावरून अजितदादांनी उडवली राणेंची खिल्ली; फडणवीस म्हणाले, तुमचे जुने व्हीडिओ काढले तर?
३ मार्च ते २५ मार्च या कालावधीत महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. तर, ११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल. यादरम्यान विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही पार पडेल. ही निवडणूक ९ मार्च रोजी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची परवानगी आवश्यक आहे.

Live updates:

दुसऱ्या दिवशी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा मुद्दा भाजपकडून पुन्हा एकदा उचलून धरला जाऊ शकतो
पहिल्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अभिभाषण अर्धवट सोडून माघारी जाण्याची वेळ ओढावली होती
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस

राज्यपाल सभागृहात आले आणि निघून गेले; नेमकं काय घडलं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here