नागपूर: करोनाविरुद्ध लढ्यात भारत एकजूट आहे, याचे दर्शन अवघ्या जगाला घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या रविवारी रात्री ९ वाजता आपल्या घरातील लाईट बंद करून ९ मिनिटे घरात वा खिडकीत दिवे लावण्याचे आवाहन केले असून महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्याबाबत आणखी एक सूचना नागरिकांना केली आहे.

करोनाविरुद्ध लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला उद्या रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाईट बंद करून दिवे लावा, असे सांगितले आहे. मात्र हाताला सॅनीटायझर लावून दिवे वा मेणबत्ती लावल्यास त्यात असलेल्या अल्कोहमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सॅनिटायझर लावून दिवे लावू नका, सावधगिरी बाळगा, असे आवाहन डॉ. नितीन राऊत यांनी आज केले.

एकाचवेळी सर्वत्र लाईट बंद केल्यास देश अंधारात बुडण्याचा धोका आहे, असे विधान राऊत यांनी शुक्रवारी केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा आपला आक्षेप नोंदवताना अतिउत्साहाच्या भरात जनतेच्या जिवाशी खेळ होऊ घातला आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली. जनतेने लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे, सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवावे, गर्दी करू नये,कोणत्याही परिस्थितीत उत्सवाचे स्वरूप येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही राऊत यांनी केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here