कीव्ह, युक्रेन :

युक्रेनच्या युद्धभूमीतून भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत एअर इंडियाचं आणखी एक विमान आज (४ मार्च) पहाटे भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाच्या बुखारेस्टहून मुंबई विमानतळावर दाखल झालं. तर आणखीन काही उड्डाणं नियोजित आहेत. याच दरम्यान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे बुखारेस्टच्या सिरेत भागात ठाण मांडून बसलेत. त्यांच्यासोबत मोदी सरकारचे चार मंत्री युक्रेनशी लागून असलेल्या देशांत उपस्थित असून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी धाडण्यासाठी व्यवस्था हाताळत आहेत. मुलांना मायदेशात आणण्यासाठी मदत पुरवण्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्नही अनेक जणांकडून केला जातोय.

याच दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये शिंदे युक्रेनमधून कशीबशी आपली सुटका करत युक्रेनच्या सीमेपर्यंत पोहचण्यात यशस्वी ठरलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. मात्र, या दरम्यान रोमानियाचे मेयर ज्योतिरादित्य शिंदे यांना हटकताना या व्हिडिओत दिसून येत आहेत.

Scindia in Romania: विद्यार्थी सुखरूप बाहेर पडेपर्यंत ‘सिरेत’ सोडणार नाही, ज्योतिरादित्य शिंदेंचं आश्वासन
युद्धाभूमीवरच्या कहाण्या! युक्रेनमध्ये केवळ पाण्यावर त्यानं काढले चार दिवस
‘रोमानियामध्ये पोहचू शकलेल्या विद्यार्थ्यांना जेवण आणि त्यांची राहण्याची व्यवस्था तुम्ही नाही तर आम्ही केलीय. तुम्ही केवळ स्वत:बद्दल बोला’ अशी आठवण रोमानियाच्या मेयरनं ज्योतिरादित्य शिंदेंना करून दिल्याचं या व्हिडिओत दिसतंय.

त्यांच्या या वक्तव्यावर मात्र ज्योतिरादित्य शिंदे थोडं असहज झालेले दिसून येतात. त्यामुळे, लगेचच चिडून ‘मला काय बोलायचं हे मी ठरवेन’ असं ते सुनावतात.

रोमानियाच्या मेयरच्या या वक्तव्यावर भारतीय विद्यार्थी टाळ्या वाजवून त्यांचं समर्थन करतानाही दिसून येतात.

ज्योतिरादित्य शिंदे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला दिसून येतोय. त्यांच्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रियाही दिसून येत आहेत. ‘ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अहंकारामुळे भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यास अडथळे येऊ शकतात’, अशी प्रतिक्रियाही एका युझरनं व्यक्त केलीय.

याच दरम्यान, एका टीव्ही माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना एका विद्यार्थीनीनं आपली जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ‘युक्रेनची सीमा ओलांडल्यानंतर कुणीही त्या-त्या देशांतून विमान तिकीट खरेदी करून आपल्या घरी पोहचू शकतं. लाखो रुपये खर्च करून या देशांत शिक्षणासाठी दाखल झालेले विद्यार्थी मायदेशी परतण्यासाठी ३० हजारांचा खर्च तर नक्कीच उचलू शकतात. युद्ध क्षेत्रात – युक्रेनमध्ये भारत सरकारची मदत मिळाली असती तर वेगळी गोष्ट होती. परंतु, विद्यार्थी युक्रेनमधून शेजारील देशांत स्वत:च पोहचलेले आहेत. यात भारत सरकारची त्यांना कोणतीही मदत पोहचू शकली नाही’, असं या विद्यार्थीनीनं म्हटलंय.

काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही एक व्हिडिओ शेअर केलाय. युक्रेनहून मायदेशी परतणारे विद्यार्थी भाजप सरकारच्या पीआर मशीनरीची पोलखोल करत आहेत, असं त्यांनी म्हटलंय.

indian students in kharkiv : भयंकर! १७०० भारतीय विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास, रशियाच्या दिशेने निघाले पायी
indian student injured : मोठी घटना… युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी, हॉस्पिटलमध्ये दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here