कीव्ह, युक्रेन :

रशियानं युक्रेनवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा आजचा नववा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरांवर क्रूझ मिसाईलच्या सहाय्यानं हल्ले सुरूच आहेत. रशियन युद्धनौकांनी काळ्या समुद्रातही युक्रेनच्या समुद्री सेनेला घेराव घातलाय. याच दरम्यान, शत्रुसमोर गुडघे टेकण्यास नकार देणाऱ्या युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी समोरा-समोर चर्चेचं खुलं आव्हान दिलंय.

‘मी चावा घेत नाही’

झेलेन्स्की यांनी पत्रकार परिषदेसमोर एका टेबलावर आमने-सामने बसून खुल्या चर्चा करण्याचं आव्हान पुतीन यांना दिलंय. ‘माहीत नाही पुतीन कशाला घाबरत आहेत? मी शेजारी आहे, मी कुणालाही चावा घेत नाही, एक सामान्य व्यक्ती आहे. पुतीन यांनी माझ्यासोबत बसून चर्चा करायला हवी’ असं गंमतीशीर पद्धतीनं झेलेन्स्की यांनी म्हटलंय.

सोबतच, झेलेन्स्की यांनी रशियाला सडेतोड प्रत्यूत्तर देण्यासाठी आणखीन हत्यारं पुरवण्याची मागणी पाश्चिमात्य देशांना केलीय.

Assassination of Vladimir Putin: ‘पुतीन यांची हत्या हीच जगाची महान सेवा ठरेल’
Russia Ukraine War: दुसऱ्या फेरीतील चर्चा फिस्कटली; युक्रेनचा रशियासोबत चर्चेस नकार
३० मीटर लांब टेबलचा उल्लेख

जागतिक नेत्यांच्या पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेवर मिश्किल टिप्पणी करताना, ‘मी ३० मीटर लांब टेबलवर बसून पुतीन यांच्याशी चर्चा करू शकत नाही. दोन्ही देशांत चर्चेला सुरूवात झालीय. परंतु, सद्य परिस्थिती पाहता मला चर्चेतून काही हाती लागेल असा कोणताही किरण मला दिसून येत नाही. मात्र कोणताही शब्द एखाद्या गोळीबारापेक्षा अधिक महत्त्वाचा नाही’ असं म्हणतानाच झेलेन्स्की यांनी चर्चेवर जोर दिला.

काही दिवसांपूर्वी पुतीन यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल यांच्यासहीत अनेक जागतिक नेत्यांसोबत एक बैठक घेतली होती. या दरम्यान एक लांबलचक टेबल दिसून आला होता. ३० मीटर लांब टेबलाच्या एका बाजुला पुतीन बसले होते तर थेट दुसऱ्या बाजुला बैठकीसाठी आलेल्या जागतिक नेत्यांना बसायची व्यवस्था करण्यात आली होती. याच गोष्टीवर झेलेन्स्की यांनी मिश्किल टिप्पणी करत निशाणा साधलाय.

युक्रेनला इतर देशांचं समर्थन हवंय

जग युक्रेनला समर्थन देण्यासाठी खूप वेळ वाया घालवत आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सोबतच, युक्रेनच्या आजूबाजूच्या भागांना नो – फ्लाय झोन घोषित करण्याचं आवाहन त्यांनी पाश्चिमात्य देशांना केलंय. यामुळे रशियाकडून युरोपीय देशांतून उड्डाणं घेत युक्रेनवर अवकाशातून केले जाणारे हल्ले रोखता येऊ शकतील. परंतु, अमेरिका आणि नाटोनं हे पाऊल उचलण्यास अगोदरपासून नकार दिलाय. पाश्चिमात्य देश युक्रेनला नो-फ्लाय झोन घोषित करणार नसतील तर त्यांनी युक्रेनला लढावू विमानं पुरवावीत, असंही झेलेन्स्की यांनी म्हटलंय.

कुलभूषणसाठी वकील नियुक्त करण्याची संधी भारताला द्यावी, कोर्टाचे पाक सरकारला निर्देश
Jyotiraditya Scindia: शिंदेंना रोखत त्यांनी म्हटलं, ‘विद्यार्थ्यांची राहण्या-खाण्याची सोय तुम्ही नाही आम्ही केलीय’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here