नितेश राणे यांना ३ मार्च आणि नारायण राणे यांना ४ मार्च रोजी जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. | Naryan Rane and Nitesh Rane

नारायण राणे आणि नितेश राणे
हायलाइट्स:
- दिशा सालियन प्रकरणात राणे पितापुत्रांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
- नारायण राणे यांना तुर्तास दिलासा
या अर्जावर शुक्रवारी दिंडोशी न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना लेखी उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणाची पुढील सुनावणी १० मार्चला होणार आहे. तोपर्यंत नारायण राणे आणि नितेश राणे यांना अटक होणार नसल्याची हमी विशेष सरकारी वकिलांनी दिली. दरम्यान आता नितेश राणे शनिवारी दुपारी एक वाजता मालवणी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी जाणार आहेत. मात्र, १० तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण असल्याने ते काहीसे निश्चिंत असतील.
दिशा सालियन प्रकरणात आरोप करणं नारायण राणे यांना भोवलं
मुंबई पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे या पितापुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले होते. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांकडून महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर कारवाई सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकारनेही भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी हालचाली सुरु केल्याची चर्चा होती. त्यामुळे आता राणे पिता-पुत्र ठाकरे सरकारचं पहिलं टार्गेट ठरणार का, अशी चर्चा सुरु होती. मात्र, तुर्तास राणे पितापुत्रांना अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळाला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : narayan rane and nitesh rane gets interim protection from arrest by sessions court in disha salian case
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network