धुळे: शालकाच्या साखरपुड्यासाठी जात असताना भरधाव डंपर व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार पितापुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात दुचाकीवरील एका व्यक्तीचे शिर धडावेगळे झाले आहे.

वाचा:

तालुक्यातील देवाचे विखरण येथील विनोद हिम्मतसिंग राजपूत हे कामानिमित्त गुजरातमधील सुरत येथे वास्तव्यास होते. दोन दिवसांपूर्वी सुरत येथून ते आपल्या गावी विखरण येथे आले होते. शालकाच्या साखरपुड्यासाठी आज ते त्यांचा लहान मुलगा कृष्णा विनोद राजपूत याच्या सोबत विखरण येथून चिमठाणे येथे दुचाकीने जात होते. भडणे फाट्याजवळ त्यांची दुचाकी वाळू वाहतूक करणाऱ्या एका भरधाव डंपरला धडकली. त्यात विनोद राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला येथे घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. या अपघातात विनोद राजपूत यांचे शीर आणि धड वेगळे झाले होते. अपघातग्रस्त डंपर शिंदखेडा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here