जळगाव : चोपडा तालुक्यातील वाळकी येथे एका तरुणाने सहा एकर शेतीत अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आज सकाळी घटनास्थळी दाखल होत आरोपी तरुणावर कारवाई केली. आरोपीने यू-ट्यूबवरील व्हिडिओ बघून अफूची शेती केल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालं आहे. (Jalgaon Crime News)

तालुक्यातील वाळकी येथे संशयित प्रकाश सुदाम पाटील या तरुणाकडे सहा एकर शेती आहे. परंतु सततच्या नापिकीमुळे तो कर्जबाजारी झाला होता. अशातच यू-ट्यूबवर त्याने एक व्हिडिओ पाहिला आणि वेगळ्या मार्गाने पैसे कमावण्याचं ठरवलं. प्रकाशने यू-ट्यूबवरून अफूची शेती कशी करता येईल? याचे धडे घेतले. यानंतर त्याने जवळपास सहा एकर क्षेत्रात अफूची लागवड केली. याबाबत कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने आजूबाजूला मकेचं पीक घेतलं.

तुमच्या राजकीय लढाया हायकोर्टात कशाला?; हायकोर्टानं भाजप नेत्याला फटकारलं

दरम्यान, स्थानिक पातळीवरून या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यासाठी पाऊले उचलली. शुक्रवारी सकाळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देविदास कुंनगर यांच्यासोबत मोठ्या ताफ्यासह घटनास्थळी धडक दिली. संबंधित तरुणाची विचारपूस केली असता त्याने आपल्यावर प्रचंड कर्ज होते आणि त्यामुळे खूप त्रास होत होता, म्हणून मी अफूच्या शेतीचा मार्ग अवलंबल्याचं सांगितलं आहे.

१५ दिवसांमध्ये करणार होता कापणी

प्रकाश पाटील या तरुणाने साधारण डिसेंबर महिन्यात अफू पेरला होता. त्यामुळे अफूचे पीक आता पूर्णपणे तयार झाले होते आणि पुढील १५ दिवसात या पिकाची कापणी करण्याचं प्रकाशचं नियोजन होतं. परंतु तत्पूर्वीच पोलिसांनी कारवाई केली. प्राथमिक चौकशीत प्रकाशने अमळनेर चोपडासह परिसरात साधारण दीड ते दोन किलो अफू खसखसच्या स्वरूपात विकल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here