मुंबई : काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, भविष्यातही हा ओघ असाच राहील. लातूर जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश करून लातूर जिल्हा भाजपमुक्त करण्यास सुरुवात केली असून, भाजपमुक्तीचा हा लातूर पॅटर्न मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा, असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. गांधी भवन येथे पटोले यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी लातूर जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, चाकूर, तालुक्यातील भाजपसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

तुमच्या राजकीय लढाया हायकोर्टात कशाला?; हायकोर्टानं भाजप नेत्याला फटकारलं

ओबीसी आरक्षणावर नवा कायदा आणणार; अजित पवारांची ग्वाही

नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा

नाना पटोले म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्षाने सत्तेत येताना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सत्तेत आल्यापासून भाजपने संविधान संपवण्याचे काम सुरू केले आहे. तर महाराष्ट्राला बदनाम करण्याचे पापही केले जात आहे. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान केला जात आहे. भाजपला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असून आज लातूरमधून भाजपमुक्तीची सुरुवात झाली असून आता हे वातावरण मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा. मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले पाहिजे, यासाठी जोमाने काम करा.’

ST Strike: एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यास नकार

‘काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही’

शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षाला लातूर जिल्ह्यात भक्कमपणे उभे केले. आज मोठ्या संख्येने भाजपसह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हे सर्वजण तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार अमित देशमुख यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष करण्यात लातूर जिल्ह्याचा मोठा वाटा असेल, असेही ते म्हणाले.

भाजपला खिंडार

लातूर जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, चाकूर, तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विशेषतः निलंगा तालुक्यातील भाजपच्या सर्व पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित तुकाराम माने, निलंग्याचे माजी नगराध्यक्ष हमिद इब्राहिम शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चक्रधर शेळके, पंचायत समिती सदस्य रमेश सोनावणे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वाती विक्रम जाधव, निलंगा तालुका भाजपाचे माजी शहराध्यक्ष संजय सुधाकर सुभेदार, निलंगा येथील ज्येष्ठ भाजप नेते आबासाहेब गोविंदराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलंगा विलास विनायक लोभे, अनुसूचित मोर्चा लातूरचे जिल्हाध्यक्ष अनिता सुधाकर रसाळ, निलंगा बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड सुनिल तुकाराम माने, निलंगा बार असोशिएशनचे सचिव प्रवीण नरहरे, एमआयएम निलंगा अध्यक्ष मनजीब अब्दुल सौदागर, अनिल चव्हाण, उमाकांत प्रल्हाद सावंत, खुदबुद्दीन घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद मुळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

गांधी भवन येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी लातूरचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, आमदार राजेश राठोड, आमदार धीरज देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड किरण जाधव, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, प्रदेश सरचिटणीस व लातूर जिल्हा प्रभारी जितेंद्र देहाडे, काँग्रेस नेते अभय साळुंके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here