उस्मानाबाद : बारावीच्या परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्याचा झालाय. ही दुर्दैवी घटना उस्मानाबादेत घडली आहे. तुळजापूर-नळदुर्ग या नॅशनल हायवे क्रमांक 206 वरती हा अपघात झाला. अर्जुन गोविंद राठोड असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे.

सदरील विद्यार्थी मोटारसायकलने बोरनदीवाडी येथून परीक्षेसाठी नळदुर्ग येथे निघाला होता. यादरम्यान गांधोरा पाटीजवळ आल्यानंतर कंटेनर क्रमांक आर. जे 32. जी. सी. 0545 या वाहनाने मोटरसायकला जोराची धडक दिली. यात अर्जुनचा जागीच मृत्यू झाला.

आपल्याकडून विद्यार्थी चिरडला गेला असल्याचं लक्षात येताच काही क्षणांत कंटेनर चालक घटनास्थळावरुन फरार झाला. आसपासच्या लोकांनी चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.

अर्जुन बोरनदीवाडीमध्ये राहायला होता. लहानपणापासून तो शांत आणि संयमी होता. अभ्यासाची त्याला रुची होता. वर्षभर अभ्यास करुन जोमात परीक्षा द्यायची आणि मोठं होऊन चांगली नोकरी करायची, असं त्याचं स्वप्न होतं. पण परीक्षेच्या काही तास आधी होत्याचं नव्हतं झालं. अर्जुनला काळाने गाठलं…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here