डोंबिवली: डोंबिवली पूर्वेकडील गोळवली परिसरात धक्कादायक घटना घडली. साफसफाई करण्याच्या वादातून बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्याविरोधात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील गोळवली परिसरात दिनकर हाईट्स नावाची तीन मजली इमारत आहे. या इमारतीचे मालक आणि व्यावसायिक आशिष गव्हाणे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत इमारत परिसरातील जागेवर साफसफाई करत होते. तिथे असलेले काही सिमेंटचे पत्रे हटवताना याच परिसरात राहणारे नीलेश गायकर यांनी हटकले. ही जागा आमची असून, तू पत्रे हटवतोस अशी विचारणा त्याने केली. यावरून आशिष व नीलेश यांच्यात वाद झाला. या वादातून नीलेश, त्याचा भाऊ अमित याने आशिषला मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

प्रेमात ‘थरार’ कसला…! तरुणीशी सूत जुळल्याच्या संशयातून वाद, तरुणाला कारचालकानं फरफटत नेलं
कल्याणच्या गौरीपाडा तलावातील ८० कासवांच्या मृत्यूचं गूढ उकललं, जाणून घ्या नक्की काय घडलं?

पत्रे हटवण्यावरुन वाद..

इमारती परिसरात असलेले सिमेंटचे पत्रे हटवताना याच परिसरात राहणाऱ्या नीलेश गायकर यांनी त्यांना हटकले. आशिष आणि नीलेश यांच्यात यावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, नीलेश आणि त्याचा भाऊ अमित गायकर या दोघांनी आशिष गव्हाणेंना मारहाण करण्यास सुरूवात केली. तिथेच उपस्थित असलेल्या महिला आणि इतरांनी मध्यस्थी केल्याने आशिष यांची सुटका झाली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

rickshaw driver fined: अजब! रिक्षा चालकाने हेल्मेट न घातल्याने आकारला दंड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here