पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासंबंधी केलेली वायफळ टिप्पणी आम्ही बघितली. मुद्दा जम्मू-काश्मीरचा असेल तर तो भारताचा केंद्र शासित प्रदेश आहे आणि यावर बोलण्याचा इम्रान खान यांना कुठलाही अधिकार नाही, असं उत्तर रवीश कुमार यांनी इम्रान यांनी गुरुवारी केल्या ट्विटवर दिलं.
भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये सतत नाक खुपसण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. पाकिस्तानला जम्मू-काश्मीरचे कल्याण झालेले बघायचे असेल त्यांनी सीमे पलिकडील दहशतवाद संपवावा, हिंसा आणि द्वेष पसरवणं बंद करावं, असं रवीश कुमार इम्रान खान यांना सुनावलंय.
काय म्हणाले होते इम्रान खान
गुरुवारी इम्रान खान यांनी काही ट्विट केले. नेहमी प्रमाणे या ट्विटमधून त्यांनी भारताविरोधात गरळ ओकली. जम्मू-काश्मीर री-ऑर्गनायजेशन ऑर्डर २०२० या भारत सरकारच्या निर्णयावर इम्रान यांनी टीका केली. भारत डिमोग्राफी म्हणजे तेथील लोकसंख्येचं गणित बदलण्याचा प्रयत्न करत आहे, असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times