कोल्हापूर : करोनाचे निर्बंध हटवल्यानंतर व्यवहार सुरळीत होत असून आता करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराबाबतही पश्चिम महाराष्ट्र आणि जोतिबा देवस्थान व्यवस्थापन समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अंबाबाई मंदिरात आता १० वर्षांखालील मुलांनाही प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला असून प्रशासनाच्या या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला जात आहे. (Ambabai Temple Kolhapur News)

राज्यात करोना प्रादुर्भाव वाढल्यानतंर खबरदारी म्हणून अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात १० वर्षांखालील मुलांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात नव्हता. मात्र आता करोनाची तिसरी लाट ओसरल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आणि मंदिर प्रशासनानेही लहान मुलांसाठी मंदिर प्रवेश खुला केला. यामुळे स्थानिक भाविकांसह देश-परदेशातील भाविकांना आपल्या लहान मुलांसह मंदिरात प्रवेश करता येणार आहे. मात्र दर्शन घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची अट कायम ठेवण्यात आली आहे.

Indian Students In Ukraine : खारकिव्ह, सुमीमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढणार, हवाई दलाची विमानं सज्ज

महाद्वारातून मुखदर्शन न करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकोडे यांनी दिली. मार्च २०२० मध्ये भारतात करोनाची लाट आल्यानंतर १९ मार्च २०२० रोजी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर सर्व भाविकांसाठी बंद करण्यात आले. तेव्हा देवीचा नवरात्र उत्सव फक्त श्री पूजकांच्या उपस्थित करण्यात आला. त्याचवर्षी दसरा झाल्यानंतर दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर वॄद्ध आणि लहान मुले वगळून काही अटीवर मंदिरात दर्शन सुरू झाले. गतवर्षी २०२१ मध्ये करोनाची दुसरी लाट आल्यानंतर नवरात्र उत्सवात ऑनलाइन पद्धतीने भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय झाला.

दरम्यान, राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरसह इतर काही जिल्ह्यातील निर्बंध हटवले असून आता लहान मुलांपासून अबालवृद्धांना देवीचे दर्शन घेता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here