online fraud: Online Fraud : तरूणीनं अॅप डाउनलोड केलं; बँक खातं चेक केल्यानंतर बसला मोठा झटका – ratnagiri cyber crime 24 year old woman duped of rs 1 lakh after app download
रत्नागिरी : ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार सध्या वाढत आहेत. अशीच एक घटना रत्नागिरीतील झाडगाव येथे घडली आहे. अॅप डाउनलोड करण्यास सांगून युजर आयडीद्वारे सायबर चोरट्यांनी तरूणीच्या बँक खात्यातून एक लाख रुपये काढले. या प्रकरणी तरूणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तरूणीची फसवणूक केल्याचा प्रकार १ मार्च रोजी घडला. झाडगाव येथील ही तरूणी आहे. सायबर चोरट्यांनी बँक खात्यातील एक लाख रुपये काढल्याची तक्रार निकिता संतोष गिरकर ( वय २४, रा. जोशी आर्केड, झाडगाव, रत्नागिरी) हिने शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तिने मंगळवारी दुपारी एका कस्टमर केअरच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला. फोनवर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने तिला अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. तसेच युजर आयडी मागितला. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन निकिताने आयडी दिला. त्यानंतर सायबर चोरट्याने तिच्या बँक खात्यातून एक लाख रुपये काढले. संशयित आरोपीने दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून तिला कॉल केले आणि अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. अॅप डाउनलोड केल्यानंतर त्याने मागितलेला युजर आयडी दिल्यानंतर त्याने बँक खात्यातून एक लाख रुपये लंपास केले. या प्रकरणी तरूणीने तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.