आम्ही इथे तुमच्यासाठी काही खास coffee ब्रँड्स आणले आहेत. कॉफी एका क्षणात तुम्हाला तरतरीत करते. सकाळची फ्रेश सुरुवात असो की निवांत संध्याकाळ किंवा कामात गढलेले असतानाचा ब्रेक… कॉफी हवीच. म्हणूनच किचनमध्ये कॉफी नेहमीच आपल्यासाठी सज्ज असायला हवी.
इथे दिलेल्या लोकप्रिय ब्रँडच्या premium coffee ही मिळतील. कॉफी प्रेमींना या वेगवेगळ्या चवीच्या, अरोमा असलेल्या कॉफी नक्की आवडतील. चला तर मग, आजच ऑर्डर करा.

Rage Coffee 50 Gms Irish Hazelnut Flavoured Coffee
ही irish hazelnut flavoured coffee आहे. म्हणजे कॉफी आणि हेजलनट अशा दोन्ही चवी एकत्रच… डबल मजा! यात १०० टक्के अरेबिका बीन्स वापरलेल्या आहेत आणि त्यांना नैसर्गिक चवींची जोड देण्यात आली आहे. ही पूर्णपणे ग्लुटन फ्री कॉफी आहे. यात कोणत्याही प्रकारचे प्रीझर्व्हेटिव्हस नाहीत. या ब्रँडमध्ये क्रीम कॅरमल, डार्क चॉकलेट, स्पार्की ऑरेंज हे फ्लेवरही मिळतील. GET THIS


Levista Premium Instant Coffee
ही आहे Levista Premium Instant Coffee. यात ८० टक्के कॉफी आणि २० टक्के चिकरीचा ब्लेंड आहे. अव्वल दर्जाच्या अरेबिका आणि रोबस्टा बीन्स पासून बनलेली ही कॉफी चिकरीसोबत ब्लेंड केलेली आहे. ही कॉफी स्ट्राँग आहे मात्र अती नाही. त्यामुळे चव आणि अरोमा यांचा परफेक्ट बॅलन्स यात साधला जातो. ही कॉफी आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे, असाही कंपनीचा दावा आहे. GET THIS


BRU Gold Instant Coffee Powder
BRU Instant Coffee Powder हा लोकप्रिय ब्रँड आहे. यात तुम्हाला ७० टक्के कॉफी आणि ३० टक्के चिकरी असं परफेक्ट मिक्स मिळतं. अराबिका आणि रोबस्टा बीन्स योग्य प्रमाणात भाजून ही त्यापासून ही कॉफी बनवण्यात आली आहे. शिवाय, या कॉफीसाठी वापरण्यात आलेल्या नव्या पद्धतीमुळे कॉफीचा फ्रेश अरोमा कायम राहतो आणि तुम्हाला मिळते परफेक्ट कॉफी. तुम्ही ही कॉफी कोल्ड कॉफीसाठी सुद्धा वापरू शकता. GET THIS


Nescafe Gold Blend Rich And Smooth Coffee Powder
NESCAFÉ Gold Blend Rich and Smooth Coffee Powder भारतात लोकप्रिय आहेच. ही चटकन विरघळणारी प्रीमिअम दर्जाची कॉफी पावडर दक्षिण कोरियातून भारतात आयात केली जाते. कॉफीची रीच आणि स्मूद टेस्ट मिळावी यासाठी यात उच्च दर्जाच्या निवडक अरेबिका बीन्सचा वापर केला जातो. बिया निवडण्यापासून रोस्ट करणे आणि पावडर बनवणे अशा प्रत्येक टप्प्यावर काळजीपूर्वक दर्जा सांभाळला गेल्याने ही कॉफी प्रत्येक घोटाला तुम्हाला प्रीमिअम अनुभव देईल. GET THIS


Davidoff Coffee, Rich Aroma
Davidoff Coffee ही instant coffee आहे. यात तुम्हाला रीच अरोमा, फाइन अरोमा आणि ५७ एक्सप्रेसो असे तीन प्रकार उपलब्ध आहेत. कॉफीची इंटेन्स, नैसर्गिक चव आणि अरोमा आवडणाऱ्यांना ही कॉफी चटकन आकर्षित करेल. चव, गंध, स्पर्श अशा सर्व संवेदनांना जागृत करणारी, आनंद देणारी ही कॉफी आहे. रीच अरोमा हा फ्रीज ड्राइड इन्स्टंट कॉफीचा प्रकार आहे. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here