मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भांडुप येथील ड्रीम्स मॉलला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन बंबांच्या साह्याने कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. गेल्या वर्षी मार्च महिन्यातच या मॉलमधील कोविड समर्पित रुग्णालयात आग लागली होती. यात ११ रुग्णांचा बळी गेला होता. गेल्या वर्षभरापासून हा मॉल बंद आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जिवीतहानी नाही
ड्रीम्स मॉलमध्ये पुन्हा आग लागली. आज रात्री साधारण साडेआठच्या सुमारास ही आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीत कोणतीही जीवित अथवा कुणालाही दुखापत झाली नाही, असे सांगण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांचे मुंबई विमानतळावर दानवेंनी केले स्वागत