ईटानगर, अरुणाचल प्रदेशः जगभरात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने देशात भीतीचं वातावरण आहे. याच भीतीतून अरुणाचल प्रदेशातील एका महिला अधिकाऱ्याने शुक्रवारी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय.

करोना व्हायरसमुळे तिच्यावर कामाचा अधिक ताण होता. तसंच तिला करोनाची लागण होण्याचीही भीती होती. यामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली, असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

पापुम पारे येथील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शेरिंग युंगजोम (वय ३८) यांनी उपायुक्तांना संबोधित करून लिहिलेला अपूर्ण राजीनामा आढळला. त्यांच्या रुममध्ये टेबलावर हे राजीनाम्याचं पत्र आढळून आलं. त्यांनी बाथरूममध्ये गळफास घेतला, असं पोलीस अधीक्षक तुम्मे एमो यांनी सांगितलं. तर करोना व्हारसमुळे तिचे काम वाढले होते आणि ती मानसिक आणि शारीरिक तणावात होती, असं कुटुंबीयांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात सहारनपूरमध्ये एका व्यक्तीने करोनाच्या भीतीने आत्महत्या केली होती. या घटनांमुळे नागरिकांमध्ये करोनाची भीती वाढत असल्याचं समोर आलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here