मुंबई : ऑस्ट्रेलियाचे महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. शेन वॉर्न यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. वॉर्न यांचं निधन थायलंड मधील Koh Samui येथे झाले. वॉर्न हे ज्या व्हिलामध्ये वास्तव्यास होते तिथे ते बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्याआधीच त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या पीआर मॅनेजमेंट कंपनीने दिली.

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजीत भरीव कामगिरी करणाऱ्या शेन वॉर्न यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. परंतु अखेरीस त्यांच्यावर चेंडू कुरतडल्याचा म्हणजे बॉल टॅम्परिंगचा आरोप झाला होता. मैदानाबाहेरील त्यांचे आयुष्य कायमच वादग्रस्त राहिले. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी आणि मैदानाबाहेर स्टाईल आणि प्रेम प्रकरणांसाठी शेन वॉर्न अनेकदा चर्चेत राहिले होते.

Shane Warne च्या जाण्याने रणवीरपासून शिल्पापर्यंत सारेच झाले दुःखी, सैयामी खेर म्हणाली- चाललंय तरी काय?

कोणत्याही सिनेमातील रंजक कथेसारखं त्यांचं आयुष्य होतं. एका मुलाखतीमध्ये शेन वॉर्न यांनी सांगितलं होतं की, ‘माझ्या आयुष्यावर जर बॉलिवूड सिनेमा काढायचा असेल तर माझी भूमिकेसाठी शाहरुख खान अगदी योग्य आहे.’

शेन वॉर्न

या अभिनेत्रींना करायचे होते डेट

अभिनेत्री आणि मॉडेल लिज हर्ले सोबत शेन वॉर्नचे अफेअर होते. बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्री आवडतात असा प्रश्न शेन यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची नावं घेतली होती. इतकेच नाही तर त्या दोघींसोबत एक क्रिकेट सामना पाहायची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली होती. भारताविषयी खास प्रेम असलेल्या वॉर्नला देशात रहायला आणि इथल्या खाद्यपदार्थांची चव चाखायला आवडायचं. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आणि नंतर प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here