औरंगाबाद : जागतिक महिला दिनाच्या निमित्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) महिला पर्यटकांसाठी विशेष योजना जाहीर केली आहे. ६ ते १० मार्चच्या दरम्यान एमटीडीसीच्या पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास येणाऱ्या महिला अतिथींना व त्यांच्या परिवाराला पर्यटक निवास कक्ष आरक्षणावर पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे.

या विशेष योजनेबद्दल एमटीडीसीचे उप महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्रामार्फत यंदाच्या जागतिक महिला दिनाचे बोधवाक्य ‘आजची लैंगिक समानता, उद्याची शाश्वती’ हे ठेवण्यात आले आहे. सर्वच क्षेत्रात खंबीरपणे अग्रेसर असलेल्या महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी तसेच त्यांच्या प्रती असेलला आदरभाव, सन्मान व्यक्त करण्यासाठी एमटीडीसी प्रयत्न करीत असते. महिला दिनाच्या निमित्याने महिला पर्यटकांना एमटीडीसीच्या पर्यटक निवास कक्ष आरक्षणासाठी पन्नास टक्के सलवत देण्याची योजना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटन सचिव वल्सा नायर , एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे.

हातात पेढ्याचा बॉक्स आणि गुलाबाचं फुल, डोळ्यात पाणी; पोलीस आयुक्तांना पाहून आजीबाई भावूक

एमटीडीसीचे राज्यभरात तीसहून अधिक पर्यटक निवास आणि उपहारगृह आहेत. त्यात एक हजाराहून अधिक निवास कक्ष आहेत. या निवास कक्षासाठी पन्नास टक्के सवलतीची योजना केवळ ६ ते १० मार्च या कालावधीसाठीच जाहीर करण्यात आली आहे. पर्यटक निवास कक्षाच्या आरक्षणावरच ही सवलत असणार आहे. पर्यटक निवास कक्षाच्या आरक्षणासाठी महिला आतिथींना पन्नास टक्के सवलत देण्यासाठी आवश्यक प्रोमो कोड www.mtdc.co या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे आरक्षणात पारदर्शकता राहणार आहे. एमटीडीसीतर्फे भाडेतत्वावर देण्यात आलेल्या पर्यटक निवासासाठी , अतिरिक्त बेड, कॉन्फरन्स हॉलसाठी, लॉन्स, उपहारगृहातील नाश्ता-जेवणासाठी पन्नास टक्के सवलतीची योजना लागू नाही असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या पन्नास टक्के सवलतीच्या योजनेचा लाभ महिला पर्यटकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

आईसह ३ लेकरांचे विहिरीत आढळले मृतदेह; मन सुन्न करणारी घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here