माझे अभिभाषण सुरू असताना तुमच्या लोकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशा घोषणा दिल्या, असे राज्यपालांनी म्हटले. त्यावर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी चलाखपणे महाविकासआघाडीची बाजू राज्यपालांसमोर मांडली.

 

koshyari bhagatsingh

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

हायलाइट्स:

  • जयंत पाटलांची चलाखी
  • महाविकासआघाडीचे शिष्टमंडळ विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमाच्या परवानगीसाठी राज्यपालांना भेटायला गेले होते
मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी प्रचंड गोंधळ झाला होता. सभागृहातील सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) अभिभाषण अर्धवट सोडून माघारी परतले होते. या सगळ्या प्रकाराबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी शुक्रवारी महाविकासआघाडीच्या मंत्र्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. महाविकासआघाडीचे शिष्टमंडळ विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमाच्या परवानगीसाठी राज्यपालांना भेटायला गेले होते. या शिष्टमंडळात अजित पवार, अशोक चव्हाण, जयंत पाटील, नाना पटोले, अनिल परब आणि एकनाथ शिंदे यांचा समावेश होता. त्यावेळी राज्यपालांनी गेल्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले पत्र आणि अभिभाषणातील गोंधळाच्या मुद्द्यावरून महाविकासआघाडीच्या मंत्र्यांसमोर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
Bhagat singh Koshyari: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भाषण अर्धवट टाकून का गेले; नाना पटोलेंनी सांगितलं खरं कारण
माझे अभिभाषण सुरू असताना तुमच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा दिल्या, असे राज्यपालांनी म्हटले. त्यावर जयंत पाटील यांनी चलाखपणे महाविकासआघाडीची बाजू राज्यपालांसमोर मांडली. आघाडीच्या आमदारांनी शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या आणि ती तुमच्या स्वागतासाठी होती. घोषणा देऊन आमचे लोक शांत झाले होते, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यानंतर राज्यपालांनी लगेच सभागृहात दाऊदविषयी दिल्या जाणाऱ्या घोषणांचा उल्लेख केला. परंतु, या घोषणा आम्ही नव्हे तर भाजपचे आमदार देत होते. त्यांनीच तुमच्या अभिभाषणात व्यत्यय आणला, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्यपाल सभागृहात आले आणि निघून गेले; नेमकं काय घडलं?

या सगळ्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी उपस्थित केला. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणतेही ठोस उत्तर दिले नाही. त्यामुळे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार की नाही, याबाबत साशंकताच आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : governor bhagat singh koshyari express displeasure infront of mahavikas agahdi ministers over chaos during speech at maharashtra vidhan sabha
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here