रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील भातगाव कोसबीवाडी येथे वऱ्हाडी मंडळींना जमवून विवाह सोहळा करणाऱ्या दोन्ही बाजूंचे यजमान, पोलिस पाटील व भटजी यांच्यावर गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे १०० ते १२० जण विवाहास उपस्थित होते. लॉकडाऊनचे नियम मोडल्याने या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines