औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी अजूनही तिथेच अडकून पडले असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. मराठवाड्यातील अजूनही ३३ विद्यार्थी युक्रेनमध्ये असून, त्यांना परत आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे आपले मुलं कधी परत येणार याकडे पालकांच लक्ष लागले आहे.

मराठवाड्यातील तब्बल ११५ विद्यार्थी युक्रेनमधील व्हिनित्सिया, युझोर्ड, ओबॅस्क, ओडेसा, कीव्ह, लिव्ह, जॉर्जिया इ. ठिकाणच्या विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते. दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणले जात आहे. तर मराठवाड्यातील ११५ पैकी ८२ विद्यार्थ्यांना आतापर्यंत परत आणले असून,३३ विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये अडकलेले आहे. त्यामुळे पालकांचा जीव टांगणीला लागला असून, त्यांना मुलांची चिंता लागली आहे.

संजय राऊत, एकनाथ खडसे यांचेही २ महिने फोन टॅप?
विद्यार्थ्यांनी सांगितली आपबिती…

औरंगाबाद शहरातील युक्रेनमध्ये अडकलेली ७ मुलं गुरुवारी परत आली. यावेळी परतलेल्या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील भयावह परिस्थितीची आपबीती यावेळी सांगितली. त्यांना दोन-दोन दिवस उपाशी राहावं लागलं. मारहाण झाली, तर युक्रेनमधून निघत्यावेळेस त्या ठिकाणी मोबाईल मध्ये सुद्धा नेटवर्क नव्हते. गाड्याही मिळत नव्हत्या त्यामुळे दहा- दहा किलोमीटर पायी चालावे लागले, असं यावेळी विद्यार्थी म्हणाले.

पालकांचा अश्रूंचा बांध फुटला…

युक्रेनला युद्धात अडकलेले औरंगाबादचे सात विद्यार्थी गुरुवारी संध्याकाळी चिखलठाणा विमानतळावर दाखल झाले होते. यावेळी मुलांना घेण्यासाठी पालकांसह नातेवाईकांनी गर्दी केली होती. रशिया आणि युक्रेन संघर्षामध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत असल्याच्या रोज बातम्या येत असताना, आपली मुलं सुरक्षित घरी परतल्याच्या पालकांचा आनंद यावेळी पाहायला मिळाला. तर मुलांना पाहून पालकांचा अश्रूंचा बांध फुटला आणि ते ढसाढसा रडू लागले. यावेळी विद्यार्थ्यांनीही आनंद अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

Weather Alert : येत्या ४ दिवसांत राज्यावर आस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here