Petrol Diesel Prices Today : रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शनिवारी सकाळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ११८ डॉलरवर पोहोचले आहे. सात वर्षांतील ही उच्चांकी पातळी आहे. कच्च्या तेलाच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

तेल कंपन्यांनी याआधी लखनऊ, गुरुग्राम, जयपूर, पाटणा या राज्यांच्या राजधानीत तेलाच्या किमती बदलल्या आहेत. मात्र, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळपास चार महिन्यांपासून स्थिर आहेत. असे असतानाही मुंबईत पेट्रोलचा दर आजही सर्वाधिक ११० रुपयांच्या आसपास आहे.

निर्देशांक आपटीतही या समभागांनी दिवसाच्या नीचांकीवरून माघारीचा प्रवास केला
महानगरांमधील इंधनांचे दर

– दिल्लीमध्ये पेट्रोल ९५.४१ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रति लीटर
– मुंबई पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रति लीटर
– चेन्नई पेट्रोल १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रति लीटर
– कोलकाता पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रति लीटर

दररोज सकाळी ६ वाजता नवीन दर जाहीर

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता बदलतात. नवे दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होणार होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते.

सप्ताहअखेर या शेअरची दमदार कामगिरी, सोमवारीही या स्टॉक्सकडे लक्ष ठेवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here