नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. हा लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत असणार आहे. यामुळे महाराष्ट्र आणि बिहारच्या विधान परिषदेच्या प्रत्येकी ९ जागांची निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात येत असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे
महाराष्ट्र आणि बिहारमधील विधान परिषदेच्या प्रत्येकी ९ जागांसाठी येत्या २४ एप्रिलला निवडणूक होणार होती. करोना व्हायरसमुळे देशात सध्या लॉकडाऊन असल्याने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं अवघड आहे. तसंच करोना व्हायरसमुळे देशातील परिस्थिती पाहता या निवडणुकांची पुढील तारीख निश्चित करणंही शक्य नाहीए. यामुळे विधान परिषदेच्या या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहे, असं केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times