आता मालवणी पोलीस ठाण्यात राणे पिता-पुत्रांचा जबाब नोंदवल्यानंतर राज्य सरकार पुढे काय पावले उचलणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तुर्तास या दोघांना अटकेपासून संरक्षण आहे.

नितेश राणे, भाजप आमदार
हायलाइट्स:
- राणे पितापुत्रांनी दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता
- नितेश राणे यांना ठाकरे सरकारला एकप्रकारे इशारा दिल्याची चर्चा
दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात नारायण राणे आणि नितेश राणे यांना १० मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण आहे. त्यामुळे आज जबाब नोंदवल्यानंतरही राणे पिता-पुत्रांना अटकेची भीती नाही. राणे पितापुत्रांनी दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना लेखी उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणाची पुढील सुनावणी १० मार्चला होणार आहे. तोपर्यंत नारायण राणे आणि नितेश राणे यांना अटक होणार नसल्याची हमी विशेष सरकारी वकिलांनी दिली.
नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा का दाखल झाला?
निराधार आरोप करून दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी महिला आयोगाकडून नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दिशा सालियन हिच्यावर बलात्कार झाला. तिच्यावर बलात्कार होताना एका मंत्र्याचे सुरक्षारक्षक फ्लॅटबाहेर होते, असा दावाही नारायण राणे यांनी अलीकडेच झालेल्या पत्रकारपरिषदेत केला होता. त्यानंतर नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनीही अशाचप्रकारच्या आरोपांची राळ उडवून दिली होती. यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. नारायण राणे आणि नितेश राणे आपल्या मुलीची मृत्यूनंतरही बदनामी करत असल्याचे दिशाच्या पालकांनी म्हटले होते. याचीच दखल घेत महिला आयोगाच्या तक्रारीनंतर राणे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : bjp leader nitesh rane tweet before going to malvani police station for disha salian case
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network