पुणे: शहरातील प्रसिद्ध चैत्राली हॉटेलला आज सकाळी आठच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वाचा:

आज सकाळी आठच्या सुमारास बंद असलेल्या हॉटेलमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. त्यामुळे आसपासच्या परिसरात घबराट पसरली. स्थानिकांची तारांबळ उडाली. या घटनेची माहिती लगेचच बारामती नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच हॉटेलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीमुळे शेजारील इमारतीचे देखील नुकसान झाले आहे. चैत्राली हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here