‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील जेठालाल आणि बबिताजी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. त्यांच्यातील मजेदार सांभाषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले आहेत. यावेळी व्हायरल होत असलेल्या शोच्या क्लिपमध्ये जेठालाल पहाटे आपल्या बाल्कनीत नेहमीप्रमाणे सूर्य देवाची पूजा करत आहे. तो पाणी अर्पण करत असताना बबिताजी तिच्या बाल्कनीत केस सुकवायला येते. जेठालाल तिला पाहतो. मंत्र जपण्याऐवजी ओम बबितये नमः, ओम बबितये नमः. असं म्हणताना दिसला.
पाहा व्हिडिओ-
जेठालालचा हा व्हिडिओ ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिलं, ‘ठर्की जेठालाल’, तर दुसऱ्याने ‘ओ जेठा जी’ अशी कमेंट केली आहे. इतर चाहतेही एकामागून एक हसणारे इमोजी पोस्ट करून अशाच पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत.
मालिकेत बबिताजीच्या भूमिकेत मुनमुन दत्ता आहे. जेठालालच नाही तर सोशल मीडियावरील युझर्सही तिच्या सौंदर्यामुळे वेडे झाले आहेत. इन्स्टाग्रामवर तिचा प्रत्येक फोटो व्हायरल होतो. मुनमुन दत्ताचे सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोइंग आहे. तर अलिकडेच जेठालालने देखील त्याचं अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट उघडलं आहे.