इम्फाळ, मणिपूर :

मणिपूर विधानसभा निवडणुकीत आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. याच दरम्यान हिंसाचाराच्याही काही बातम्या समोर येत आहेत. हिंसाचारात आतापर्यंत दोन सामान्य नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. हे दोन्ही मृत्यू वेगवेगळ्या भागात झाले आहेत.

हिंसाचाराची पहिली घटना थौबल जिल्ह्यात तर दुसरी घटना सेनापती जिल्ह्यात घडल्याची माहिती मिळतेय.

सेनापती भागात मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन जाणाऱ्या एका बसला काही असामाजिक तत्त्वांनी लक्ष्य केलंय. मतदान केंद्राकडे जात असताना या बसवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झालाय.

मणिपूरमध्ये मतदान सुरू

मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील २२ जागांसाठी शनिवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी दिसून येतेय. सकाळी ९.०० वाजेपर्यंत ११.४० टक्के मतदानाची नोंद झालीय. दुसऱ्या टप्प्यात थौबल, चंदेल, उखरुल, सेनापती, तामेंगलाँग आणि जिरीबाम जिल्ह्यातील २२ जागांसाठी मतदान सुरू आहे.

Indian Students In Ukraine : खारकिव्ह, सुमीमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढणार, हवाई दलाची विमानं सज्ज
kcr met hemant soren : उद्धव ठाकरेंनंतर आता केसीआर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना भेटले; तिसऱ्या आघाडीवर म्हणाले…

मणिपूर विधानसभेच्या ३८ जागांसाठी सोमवारी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडलं होतं. राज्यातील ५ जिल्ह्यांतील ३८ जागांवर सोमवारी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ७८.०३ टक्के मतदान नोंदवण्यात आलं. त्यापैंकी कांगपोकपी इथं सर्वाधिक ८२.९७ टक्के मतदानाची नोंद झाली. पहिल्या टप्प्यातील मतदानात मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचंही भवितव्यही ईव्हीएममध्ये कैद झालंय.


१० मार्च रोजी निकाल

मणिपूरसहीत उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. या सर्व राज्यांचे निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहेत.

Indian Students In Ukraine : ‘मोदीजी जिंदाबाद…’, युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांसमोर घोषणा देणारे केंद्रीय मंत्री वादात
नागरिक साखरझोपेत असताना भीषण स्फोट; तीन घरे बेचिराख, ७ जणांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here