मॉस्को, रशिया :

सगळ्या जगाला चिंतेत टाकणाऱ्या युद्धाला सुरुवात झाल्यानंतर १० दिवस उलटले तरीही रशियाला युक्रेनवर विजय मिळवता आलेला नाही. याच दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपण युक्रेनसोबत चर्चेसाठी तयार असल्याचं म्हटलंय. पण चर्चेसाठी त्यांनी आपल्या तीन अटीही समोर ठेवल्या आहेत.

आपल्या अटी मान्य करण्यात आल्या तर आणि तरच युक्रेनशी चर्चा शक्य आहे, असा पुनरुच्चार पुतीन यांनी केलाय. रशियन राष्ट्राध्यक्षांचं कार्यालय – ‘क्रेमलिन‘नं दिलेल्या माहितीनुसार, रशियासाठी युक्रेनियन पक्ष आणि इतर सर्वांसोबत चर्चेचा पर्याय खुला आहे. परंतु, यासाठी या पक्षांनी रशियाच्या मागण्या कोणत्याही अटीशिवाय मान्य करायला हव्यात. पुतीन यांनी हे वक्तव्य जर्मन चान्सलर ओलाफ सोल्ज यांच्याशी संभाषणा दरम्यान केलंय.

पुतीन यांच्या तीन मागण्या…

– युक्रेन हा तटस्थ आणि गैर-अणुऊर्जा देश असेल

– क्रिमिया हा रशियाचाच भाग आहे, हे युक्रेननं मान्य करावं

– आणि पूर्व युक्रेनच्या बंडखोर भागांचं स्वातंत्र्य मान्य केलं जावं

अशा तीन मागण्या पुतीन यांनी समोर ठेवल्या आहेत. यामध्ये दोन्ही देशांतील चर्चेच्या तिसऱ्या फेरीत सकारात्मक चर्चेची आशा व्यक्त करण्यात आली आहे. तसंच युक्रेन सरकार तर्कसंगत आणि सकारात्मक दृष्टीकोन दर्शवेल अशी आशाही क्रेमलिननं व्यक्त केलीय.

कीव्ह मीडियाच्या म्हणण्यानुसार, दोन्ही देशांत चर्चेची पुढील फेरी आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात आतापर्यंत चर्चेच्या दोन फेऱ्या आयोजित करण्यात आल्या असल्या तरी त्यातून युद्धाला कोणतंही ठोस उत्तर निघू शकलेलं नाही.

रशियाकडून युक्रेनच्या दोन शहरांत सीझफायरची घोषणा, नागरिकांना शहर सोडण्याचं आवाहन
युक्रेनच्या सीमेवर रशियाच्या गुप्तहेराला अटक, पत्रकार असल्याची बतावणी उघड
‘नागरी शहरांवर हल्ले नाही’

युक्रेनकडून रशियावर नागरी शहरांवर बॉम्बवर्षाव केल्याचा दावा करण्यात आला होता. हा दावाही रशियानं फेटाळून लावलाय. युक्रेनच्या शहरांवर बॉम्बहल्ले केल्याच्या बातम्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचं ‘क्रेमलिन’नं म्हटलंय.

युक्रेनच्या दोन शहरांत ‘तात्पुरता’ युद्धविराम

दरम्यान, शनिवारी रशियानं युक्रेनच्या मारियुपोल आणि वोल्नोवाखा या दोन शहरांत तात्पुरत्या स्वरुपात सीझफायरची घोषणा केलीय. नागरिकांना शहरातून बाहेर पडण्यासाठी सुरक्षित कॉरिडोर उपलब्ध करून देण्याचं रशियाकडून सांगण्यात आलंय. रशियाच्या संरक्षण मंत्रालयातकडून याची पुष्टी करण्यात आलीय.

VIDEO: इम्रान खान यांच्याविरोधात प्रचार, बेनझीर भुट्टो यांच्या मुलीच्या चेहऱ्यावर आदळला ड्रोन
Ukraine Crisis: झापुरीझझिया अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाचा गोळीबार, अणुस्फोटाच्या भीतीनं युरोपचा थरकाप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here