मुंबई: राज्यात काल दिवसभरात करोनाचे १४५ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ६३५वर गेली आहे. तर राज्यात करोनाने आतापर्यंत ३२ जण दगावले असून ५२ लोकांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिलेले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लॉकडाऊन हटवायचा की नाही हे राज्यातील जनतेवरच अवलंबून असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जाणून घेऊयात करोनाबाबतच्या घडामोडी…
Live अपडेट्स…
>> जळगावमध्ये दोन करोना संशयिताचा रात्री उशिरा मृत्यू; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू होते उपचार
>> करोनाशी लढण्यासाठी सव्वालाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देणार: आरोग्य मंत्री राजेश टोपे
>> उस्मानाबादमध्ये करोनाचा तिसरा रुग्ण आढळला
>> पिंपरी चिंचवडमध्ये धोका कायम, आणखी ६ जणाना लागण
>> शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे कुटुंबीय होम क्वॉरंटाइन
>> शनिवारी राज्यात करोनाचे १४५ नवे करोना रुग्ण आढळले
>> आज रात्री ९ वाजता दिवे किंवा मेणबती पेटवताना हाताला सॅनिटायझर लावू नका
>> राज्यात शनिवारी सहा करोना रुग्णांचा मृत्यू; यातील चारजण मुंबई, एक अमरावती आणि ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील रहिवासी होता
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times