महाड: महाडमध्ये छबिना उत्सवात अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. काल, शनिवारी हा अपघात झाला आहे. आकाश पाळण्यामध्ये बसलेल्या महिलेचे केस अडकल्याने हा अपघात झाला.

महाडमध्ये छबिना उत्सव भरला होता. या उत्सवासाठी जिल्ह्यासह महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक येतात. या उत्सवात काल, शनिवारी अपघात झाला. आकाश पाळण्यामध्ये केस अडकून महिला गंभीर जखमी झाली आहे. पल्लवी सूरज कोलणकर (वय ३०, रा. निजामपूर, माणगाव) असे या जखमी महिलेचे नाव आहे. हाताने फिरवण्यात येणाऱ्या आकाश पाळण्यामध्ये ती बसली होती. पाळणा सुरू झाला, तेव्हा तिचे केस पाळण्यात अडकले. डोक्यावरील कातडीसह केस निघाले. महिलेच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. महाडमध्ये प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अपघातास जबाबदार असलेल्या इंदल दयाराम चौहान (मूळचा राहणार – उत्तर प्रदेश) याच्याविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ratnagiri : तरूणी अभ्यासासाठी खोलीत गेली, बराच वेळ बाहेर आली नाही; कुटुंबीयांनी बघितल्यानंतर धक्काच बसला
Online Fraud : तरूणीनं अॅप डाउनलोड केलं; बँक खातं चेक केल्यानंतर बसला मोठा झटका

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here