पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेट्रोसह विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुणे शहरात दाखल झाले आहेत. भाजपकडून पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली. मात्र दुसरीकडे महापालिकेत विरोधी पक्षात असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने नरेंद्र मोदी यांच्याकडून अर्धवट विकासकामांचं उद्घाटन केलं जात असल्याचं सांगत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. (Narendra Modi Pune Visit)

नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाल्यानंतर काँग्रेसने ‘मोदी गो बॅक’ अशा घोषणा देत आंदोलन सुरू केलं, तर राष्ट्रवादीकडून पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात मूक आंदोलन करण्यात येत आहे.

Live: पंतप्रधानांचा पुणे मेट्रोला हिरवा झेंडा; ऑनलाइन तिकीट काढून मोदींचा मेट्रो प्रवास

पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे शहरातील ‘हे’ रस्ते बंद

नरेंद मोदी यांच्या पुणे दौऱ्यामुळे शहरातील जंगली महाराज रस्ता, कर्वे-पौड रस्ता आणि विद्यापीठ रस्ता (रेंजहिल्स ते शिवाजीनगर) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी नागरिकांना नदी ओलांडून शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाता येत नाही. त्यामुळे कामाच्या वेळी खोळंबा झाल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील कर्वे रस्त्यावर दुकाने बंद करण्यात आली आहेत. पंतप्रधान या मार्गाने मेट्रोद्वारे प्रवास करणार असल्याने पोलिसांच्या दहशतीमुळे सर्व दुकाने बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ही दुकाने बंद असल्याने मेट्राने प्रवास करताना पंतप्रधानांना ‘पुणे बंद’चे दर्शन घडणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचं अनावरण केलं असून कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here