मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील खोपोली येथील अल्टा फार्मास्युटिकल लॅब या कंपनीत भीषण आग लागली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर, तातडीने यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. कंपनीला लागलेली आग इतकी भीषण होती की, चार ते पाच किलोमीटर परिसरात धुराचे लोट दिसत होते. त्यामुळे परिसरात प्रचंड भीती निर्माण झाली होती. आगीत कंपनीतील संपूर्ण प्लांट जळून खाक झाला. आठ रिअॅक्टर पूर्णपणे भक्ष्यस्थानी पडले, अशी माहिती समजते.
खोपोली नगरपालिका, अलाना कंपनीच्या अग्निशमन यंत्रणांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, धुराचे लोट हे पाच किलोमीटरपर्यंत पसरले होते. आग नियंत्रणात आली असली तरी, धोका अद्याप टळलेला नाही असे सांगण्यात येत आहे. या आगीत दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते.