उस्मानाबाद : ‘कोणी तरी म्हटलं की, आता माझं वय ८२ झालं आहे. पण मला अजून खुप करायचं आहे. जनतेनी साथ दिली तर हा गाडा चालत राहिल’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील आकुबाई पाडोळी येथे जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामांचा उद्घाटन व शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ‘५२ वर्षात तुम्ही मला भरपुर दिलं आहे. आता काही नको आता पुढील पिढीसाठी काम करायचं आहे. ४ वेळा मुख्यमंत्री केलं कोणी ४ वेळा मुख्यमंत्री होतं का? केंद्रात मंत्री आमदार-खासदार असे सलग ५२ वर्षे तुम्ही मला निवडून दिलं.’ दरम्यान, यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे जलसंधारण राज्यमंत्री संजय बनसोडे हे उपस्थित होते. करोनामुळे दोन वर्षांपासून सभा बंद होत्या. दोन वर्षानंतर पहिल्यांदा जाहीर सभा होत आहे.

मनपा निवडणुकांच्या तोंडावर भाजपला धक्का; माजी गटनेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
उस्मानाबाद जिल्ह्याने मला ४० वर्षे साथ दिली आणि आजही देत आहे. जे गेले ते गेले त्यांचा विचार नाही करायचा, असं म्हणत उस्मानाबाद जिल्ह्याची मुख्य समस्या पाणी आहे. मी आल्यानंतर व्यासपीठावरुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना बोललो आहे. पुढील ३ आठवडयात दोन धरणांची निविदा निघणार आहे.

युक्रेन – रशियाचा संघर्ष सुरू आहे. तेथे हजारो भारतीय मुले वैधकिय शिक्षणासाठी गेली आहे. ती तेथे अडकली आहेत. युक्रेन – रशिया संघर्ष संपल्यानंतर महागाईचे संकट येणार आहे. त्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करेल. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चांगले काम करत आहे. जे निकाल लागण्यापुर्वीच मी पुन्हा येणार म्हणाले होते ते कधी आलेच नाहीत.

पदावर बसलेल्या काही लोकांना पद आधिकार यांचे तारतम्य राहत नाही असे म्हणत नाव न घेता राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टिका केली. या वेळी जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कमी शेतीत लाखोचं उत्पन्न, मोसंबीच्या बागेने शेतकऱ्याचं आयुष्य बदललं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here