परभणी लाइव्ह बातम्या: शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी, शॉर्ट सर्कीटच्या आगीत १०० एकरावरील ऊस जळून खाक – parbhani news today burning 100 acres of sugarcane in the fire of short circuit
परभणी : शॉट सर्कीट होवून लागलेल्या आगीत जवळपास १०० एकरावरील ऊस जळून खाक झाला. ही घटना पालम तालुक्यातील फळा व सोमेश्वर शिवाारात ६ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, येथील शेतक-यांनी गंगाखेड येथील अग्नीशमन दलास पाचारण केले होते.
पालम तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. परिसरातील कारखान्याच्या गाळप क्षमतेच्या डोईजड ऊस झाला आहे. तो शेतात तसाच उभा असताना सोमेश्वर व फळा शिवारातील शिवरस्त्यालगत शॉट सर्कीट होवून ऊसाला आग लागली. सुरूवातील आग विझविण्याचा केविलवाना प्रयत्न शेतक-यांनी केला. परंतु आग मोठ्या क्षमतेने लागल्याने शेतकऱ्यांनी गंगाखेड येथील अग्नीशमन दलास पाचारण केले होते. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारन केले. वा-यामुळे ही आग वनव्यासारखी एका शेतातून दुस-या शेतात जाऊ लागली. ती वाळलेल्या पाचटीमुळे विझविता आली नाही. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे ढग; ‘या’ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी आगीचे मोठ लोळ निर्माण होऊ लागले. म्हणून आगीच्या भक्षस्थानी जवळपास १०० एकरावरील ऊस सापडला. परिमाणी, फळा आणि सोमेश्वर गावातील जवळपास ५० हून अधिक शेतकऱ्यांचा ऊस खाक झाला. सर्वांचे मिळून ०१ कोटी रूपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवारी दुपारी २.१५ वाजेपर्यंत आग विझली नव्हती.
दोन्ही गावाासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती. अद्याप महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. परंतु पालम पोलीस ठाण्याचे पोनि प्रदीप काकडे यांनी घटनास्थळी धाव घेवून शेतकऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या परिसरात आणखखी २०० एकर ऊस असल्याची माहिती फळा गावचे सरपंच अंगद पौळ यांनी दिली.