औरंगाबाद : राज्यात पुढील दोन-तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. त्यानुसार, आज औरंगाबादच्या काही भागांमध्ये प्रत्यक्षात पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली असून, रब्बी हंगामाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
शेतकरी पुन्हा अडचणीत…
आधी अतिवृष्टी त्यानंतर अवकाळी पाऊस या सर्वातून सावरत बळीराजा पुन्हा एकदा कंबर कसून उभा राहिला असतानाच आता पुन्हा एकदा आवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अडचण वाढवली आहे. गहू, हरभऱ्यासह अनेक रब्बीच्या पिकांना याचा फटका बसणार आहे. आशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कसं जगावं असा प्रश्न बळीराजाला पडत आहे.