वर्धा : नदीत पोहायला गेलेल्या चार युवकांपैकी दोन युवकांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तर दोन युवक बचावले आहे. घटना हिंगणघाट गलुक्याच्या हिवरा येथील नदीपात्रात घडली.
घटनेची माहिती मिळताच हिवरा येथील नागरिकांनी नदीपात्राकडे धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने रुतीक नरेश पोखळे आणि संघर्ष चंदू लढे या दोघांचे मृतदेह नदीपात्रा बाहेर काढण्यात आले. तर रणजित धाबर्डे आणि शुभम लढे हे दोघे बचावले आहे. या दुर्देवी घटनेमुळे परीसरात शोककळा पसरली आहे.