विधानसभेत भाजपकडून आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उचलून धरला जाऊ शकतो. त्यामुळे महाविकासआघाडी या दोन्ही मुद्द्यांवरून विरोधकांच्या टीकेचा सामना कशाप्रकारे करणार, हे पाहावे लागेल.

 

Maharashtra Assembly

अर्थसंकल्पीय अधिवेशन

हायलाइट्स:

  • अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे
  • सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने संघर्ष
मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. गेल्या आठवड्यात सभागृहात दोन दिवस कामकाज झाले. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने संघर्ष होताना दिसला. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) अंतरिम अहवाल फेटाळल्यानंतर अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने महाविकासआघाडीला (Mahavikas Aghadi government) लक्ष्य केले. हा विरोध आणि आगामी काळातील महानगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेता महाविकासआघाडी सरकारने आता ओबीसी आरक्षणासाठी नवा कायदा अंमलात आणण्याचे ठरवले आहे. त्यासाठी सोमवारी विधानसभेत विधेयक मांडण्यात येणार आहे. या कायद्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तारखा ठरवणे, प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारला मिळणार आहेत. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्यादृष्टीने नव्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची वाट सुकर होईल. तर दुसरीकडे विधानसभेत भाजपकडून आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उचलून धरला जाऊ शकतो. त्यामुळे महाविकासआघाडी या दोन्ही मुद्द्यांवरून विरोधकांच्या टीकेचा सामना कशाप्रकारे करणार, हे पाहावे लागेल. याशिवाय, येत्या ११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे या आठवड्यात सभागृहात अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय, दिशा सालियन प्रकरणावरून राणे पिता-पुत्रांची पोलिसांकडून झालेली चौकशी, फोन टॅपिंग प्रकरण आणि अन्य मुद्द्यांवरूनही सभागृहात वाद रंगण्याची शक्यता आहे. (Maharashtra Budget Session Live Updates)

Live Updates:

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार विधेयक मांडणार, आजच चर्चा होऊन मंजुरी मिळण्याची शक्यता

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra budget session vidhansabha adhiveshan live updates nawab malik resignation obc reservation bill mahavikas agahdi bjp
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here