मॉस्को, रशिया :

रशिया आणि युक्रेन मैदानावर युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चात्य देशांनी युक्रेनच्या मदतीला आपलं सैन्य पाठवण्यास नकार दिला आहे. मात्र अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय देशांकडून युक्रेनला शस्त्रांस्त्रांचा पुरवठा केला जातोय. युक्रेनवर रशियन हवाई हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी पोलंडकडून अमेरिकेला एक ऑफर देण्यात आली होती. युक्रेनला आपली जुनी विमानं देण्याची तयारी पोलंडनं दर्शवली होती. परंतु, या बदल्यात पोलंडनं अमेरिकेकडे एफ १६ फायटर जेटसची मागणी केली. परंतु, पुतीन यांच्या धमकीनंतर पोलंडनं आपला प्रस्ताव माघार घेतलाय.

अमेरिकेनं पोलंडचा प्रस्ताव स्वीकारल्याचं रविवारी समोर आलं होतं. परंतु, ‘जो देश कीव्हची मदत करेल तो देश युद्धात सहभागी आहे, असं मानलं जाईल’ या पुतीन यांच्या धमकीनंतर पोलंडनं आपले पाऊल मागे घेतलंय.

युक्रेनचं हवाई क्षेत्र ‘नो फ्लाय झोन‘ घोषित करावं, अशी मागणी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ‘नाटो’कडे केली होती. परंतु, झेलेन्स्की यांची ही मागणीही नाटोनं नाकारलीय. त्यामुळे झेलेन्स्की यांनी रशियाला प्रत्यूत्तर देण्यासाठी लढावू विमानांची मागणी केली होती.

युक्रेनचे भविष्य धोक्यात! रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या वक्तव्याने चिंता वाढली
russia-ukraine crisis : ​युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होणार!, सामान्यांवर कोसळणार​ महागाईची कुऱ्हाड
अमेरिकेने पोलंडचा प्रस्ताव स्वीकारला पण…

पोलंडनं आपली मिग-२९ आणि सुखोई-२५ ही लढावू विमानं युक्रेनला देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु अमेरिकेनं या बदल्यात आपली एफ-१६ विमानं पोलंडला द्यावीत, अशी मागणी पोलंडनं केली होती. रविवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी या प्रस्तावाबद्दल माहिती दिली. या प्रस्तावाबाबत पोलंडशी चर्चा सुरू असून त्याला ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आल्याची माहिती ब्लिंकन यांनी दिली होती.

पुतीन यांची धमकी

मात्र, अमेरिकेनं आणि पोलंडनं प्रत्यक्ष काही पावलं उचलण्याआधीच रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं ‘नाटो’सह इतर देशांना धमकी देण्यात आली. ‘कीव्ह’ला लष्करी विमानं पुरवल्यानं संघर्ष वाढू शकतो, असं रशियनं मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिली होती. ‘काही युक्रेनियन लढावू विमानं रोमानिया आणि इतर देशांमध्ये तैनात करण्यात आली आहेत. जर या विमानांनी त्यांच्या देशातून रशियन सैनिकांवर हल्ला केला तर हे देशही युद्धात सहभागी आहेत असं समजलं जाईल, असा इशाराच रशियानं दिला होता. युक्रेनची काही विमाने रोमानिया आणि इतर शेजारील देशांमध्ये दाखल झाल्याचा दावा रशियानं केला होता.

russia ukraine news : युक्रेन सैन्याचा मोठा दावा, ‘युद्धात रशियाचे सुमारे ११ हजार सैनिक ठार’
indians in ukraine : युक्रेनमधील दुतावासाचे आवाहन, ‘भारतीयांनो मोबाइल नंबर, लोकेशनसह तातडीने संपर्क करा’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here