औरंगाबाद न्यूज लाइव्ह: औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची बातमी, आज पुढचे ४ तास अंधारातच; कारण… – aurangabad news live electricity will be cut for 4 hours in aurangabad
औरंगाबाद : औरंगाबादकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या ४ तास जिल्ह्यामध्ये वीज पुरवठा खंडीत होणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद वीज पुरवठा विभाग क्षेत्रातील गंगटी इथं असलेल्या वीज उपकेंद्रात दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यासाठी वीजपुरवठा बंद करण्यात येणार असून शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित होणार आहे. सहायक विद्युत अभियंता निशांत कुमार यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
दुरुस्तीच्या कामामुळे गंगटी वीज उपकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या टाऊन फीडर, इंडस्ट्रीयल फीडर, चौरिया फीडर, पोयवान फीडर आणि हसौली कुंडा फीडरमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व महत्त्वाची कामं सकाळी ११ वाजेपूर्वी पूर्ण करावीत, असं आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे. ‘कार्यकर्ते कमी अन् पदाधिकारी जास्त’; निवडणुकांच्या आधीच काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू महत्त्वाची कामं वेळेत करा, अन्यथा होईल मनस्ताप…
पाच फिडरमधील वीजपुरवठा ठप्प राहणार असल्याची माहिती सहायक विद्युत अभियंताकडून देण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल १२ गावांमध्ये लाईट नसणार आहे. अशात ग्राहकांनी आवश्यक ती कामे वेळेत करावी. जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. यासोबतच उन्हाळ्याचे दिवस येत असल्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
खरंतर, उन्हाळा सुरू झाला की, लाईट जाण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. अशात कमी व्होल्टेजची समस्यासुद्धा असते. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. फीडरची दुरुस्ती केली जात आहे. जेणेकरून उन्हाळ्याच्या दिवसात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.