औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणूक लक्षात घेत काँग्रेसकडून शहराची जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली असून, त्यात १५० जणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्ते कमी अन् पदाधिकारी जास्त अशी चर्चा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे वर्णी न लागलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस पक्षश्रेष्ठीने औरंगाबाद शहराध्यक्ष म्हणून हिशाम उस्मानी तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी डॉ. कल्याण काळे यांची २० महिन्यांपूर्वी नियुक्ती केली होती. त्यानंतर जिल्ह्यातील आणि शहरातील काँग्रेसमध्ये अनेक फेरबदल होतील अशी अपेक्षा असतांना, दोन्ही नेत्यांनी सावध भूमिका घेत ‘जैसे थे’ ची भूमिका घेतली. मात्र, आता स्थानिक निवडणुका तोंडावर असल्याने अखेर शहरातील नवीन जम्बो कार्यकरिणी घोषित करण्यात आली आहे. ज्यात २० उपाध्यक्ष, ४४ सरचिटणीस,४३ सचिव, १ कोषाध्यक्ष, २ प्रवक्ते, ४० सदस्य असा समावेश आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात काँग्रेस मेळाव्यात एका वरीष्ठ नेत्यांनी बोलताना, ‘कार्यकर्ते कमी अन् पदाधिकारी जास्त’, असं होऊ देऊ नका, असा दिलेल्या सल्ल्याची काँग्रेसमध्ये चर्चा आहे.

Good News: तिसऱ्या लाटेत प्रथमच ‘या’ शहरातील करोना रुग्णसंख्या शून्यावर, पण…
नाराजीनाट्य…

कार्यकरिणी निवडनंतर नाराजीनाट्य हे काही नवीन नाही. असेच काही औरंगाबाद शहर काँग्रेसच्या कार्यकरिणी निवडीनंतर सुद्धा पाहायला मिळाले. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर खान यांना सचिवपद देण्यात आल्याने ते नाराज आहेत. याबाबत काँग्रेसचे शहर प्रभारी मुजाहिद खान यांच्याकडे तक्रार केल्याचे मुजफ्फर खान यांनी सांगितले. तर ‘कुणाची नाराजी असेल तर दूर करू’ असे हिशाम उस्मानी यांनी सांगितले आहे.

धक्कादायक! घरात सुरू होता वेश्या व्यवसाय; धाड टाकताच पोलिसही चक्रावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here